PM Svanidhi loan Yojana आता फक्त आधार कार्ड द्वारे मिळणार 80,000 कर्ज.

आज तरूणांना नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे.तसेच तरूणांची मानसिकता देखील बदलत आहे.विविध शहरात व्यवसाय सुरू होत आहेत.त्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा किंवा वाढवायचा आहे, पण पैशांची अडचण येत आहे? रस्त्यावर भाजी विकणारे, फळ विक्रेते, चहाचे स्टॉल चालवणारे, हातगाडी व्यवसाय करणारे किंवा इतर फेरीवाले यांच्यासाठी केंद्र सरकारने PM Svanidhi loan Yojana योजना सुरू केली आहे.

ही योजना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आधार ठरत आहे.या लेखाच्या माध्यमातून या योजनेविषयी आणि जाणून घेवूया.पूर्वी अशा छोट्या व्यावसायिकांना बँकेतून कर्ज मिळणे खूप कठीण होते. तारण नसल्यामुळे अनेकांना सावकारांकडे जावे लागायचे. मात्र आता PM Svanidhi loan योजनेमुळे कोणतीही गॅरेंटी किंवा तारण न देता कर्ज मिळवणे शक्य झाले आहे.

हे देखील वाचा

लाडक्या बहीण योजना 730 कोटी मंजूर

गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार कर्ज

PM Svanidhi loan योजना म्हणजे काय?

PM Svanidhi loan Yojana (प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी) ही केंद्र सरकारची विशेष योजना आहे. कोविड-19 काळात छोट्या व्यवसायांना पुन्हा उभारी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश स्ट्रीट व्हेंडर्सना आर्थिक मदत देणे आणि त्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा आहे.विशेष बाब म्हणजे या योजनेची मुदत आता मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मिळणारे कर्ज

या योजनेत कर्ज टप्प्याटप्प्याने दिले जाते.

✅ पहिल्या टप्प्यात – ₹15,000

✅ वेळेत परतफेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात – ₹25,000

✅ दुसरे कर्जही नियमित फेडल्यास तिसऱ्या टप्प्यात – ₹50,000अशा प्रकारे एकूण ₹80,000 पर्यंत कर्जाचा लाभ मिळू शकतो.

याशिवाय पात्र लाभार्थ्यांना ₹30,000 पर्यंतचे UPI-Linked RuPay Credit Card देखील मिळू शकते.

व्याजावर मिळते अनुदान

कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना सरकारकडून 7% वार्षिक व्याज अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते.म्हणूनच वेळेवर हप्ते भरल्यास कर्जाचा आर्थिक भार खूप कमी होतो.

पात्रता

खालील व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतात:-

भाजी, फळे, फुले विक्रेते- हातगाडी किंवा ठेला व्यवसाय करणारे-

चहा, नाश्ता किंवा खाद्यपदार्थ विक्रेते-

कपडे, चप्पल किंवा इतर वस्तू विकणारे फेरीवाले-

सलून, दुरुस्ती किंवा सेवा व्यवसाय करणारे-

स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेले Vending Certificate असलेले व्यावसायिक

अर्ज कसा करायचा?

PM SVANidhi योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे अतिशय सोपे आहे.

1. अधिकृत पोर्टलला भेट द्या.

2. “Apply for Loan” पर्याय निवडा.

3. मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करा.

4. आधार क्रमांक आणि आवश्यक माहिती भरा.

5. व्यवसायाची माहिती नोंदवा.

6. संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडे अर्ज पाठवा.

अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.

येथे अर्ज करा https://pmsvanidhi.mohua.gov.in/

डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅक

जर तुम्ही UPI, QR Code किंवा इतर डिजिटल माध्यमातून online payment स्वीकारत असाल, तर सरकारकडून अतिरिक्त कॅशबॅकचा cashback चा देखील लाभ मिळतो.काही पात्र लाभार्थ्यांना वर्षभरात ₹1,200 ते ₹1,600 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

महिलांसाठी विशेष संधी

या योजनेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अनेक महिला छोट्या व्यवसायातून स्वतःचे उत्पन्न वाढवत आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळत आहे.फक्त कर्ज नाही, इतर योजनांचाही लाभPM Svanidhi loan Yojana अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांशी जोडले जाते.यामध्ये:- आयुष्मान भारत योजना- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- उज्ज्वला योजना- जनधन योजनायांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे.

या योजनेचा फायदा काय?

अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की PM Svanidhi योजनेचा लाभ घेतलेल्या फेरीवाल्यांच्या उत्पन्नात सरासरी 20% पर्यंत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे अनेक लाभार्थ्यांनी पहिल्यांदाच बँकेतून कर्ज घेतले असून ते औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडले गेले आहेत.

आवश्यक कागदपत्रे-

आधार कार्ड-

बँक पासबुक-

मोबाईल नंबर-

Vending Certificate (असल्यास)

महत्त्वाची माहिती

कर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण 7 ते 15 दिवसांत रक्कम खात्यात जमा होऊ शकते.मात्र वेळेवर परतफेड न केल्यास व्याज अनुदानाचा लाभ मिळणार नाही आणि पुढील टप्प्यातील कर्जासाठी पात्रता देखील कमी होऊ शकते.त्यामुळे वेळेवर परतफेड करून आपला sivil score चांगला ठेवा.

निष्कर्ष

PM Svanidhi loan Yojana ही छोट्या व्यवसायांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. विना गॅरेंटी कर्ज, व्याज अनुदान, डिजिटल कॅशबॅक आणि इतर सरकारी योजनांचा लाभ या सर्व गोष्टी एकाच योजनेत मिळतात.जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी फेरीवाला, हातगाडी चालक किंवा छोटा व्यवसाय करत असेल, तर या योजनेबद्दल त्यांना नक्की माहिती द्या. योग्य वेळी मिळालेली आर्थिक मदत एखाद्याचा व्यवसाय आणि भविष्य दोन्ही बदलू शकते.

Leave a Comment