Ladaki bahin yojana installment लाडकी बहीण योजनेचा हप्तामहाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
योजनेत अनेक गैरप्रकार आढळून आले होते.खोटी कागदपत्रे अपलोड करून या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला होता.यामुळे पारदर्शकता ठेवण्यासाठी आणि खरोखर गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या बदलांचा थेट परिणाम पुढील हप्त्यांवर होणार आहे.
ई-केवायसी प्रक्रिया आता बंद
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य होते. यासाठी 30 एप्रिल ही अंतिम तारीख देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.याआधी सुद्धा दोन तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांनाच अंतिम पात्र यादीत स्थान मिळाले आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
हे सुद्धा वाचा
अपात्र अर्जांवर कडक कारवाई
सरकारकडून अर्जांची तपासणी सुरू असताना अनेक प्रकरणांमध्ये चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे आढळले. त्यामुळे आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. खालील महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे:
कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास
कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास (ट्रॅक्टर वगळून)
वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास
कुटुंबात कोणी आयकर (ITR) भरत असल्यास
अशा सर्व महिलांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. आता फक्त खऱ्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
मार्च हप्त्याबाबत मोठी बातमी
पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. माहितीप्रमाणे, सोमवारपासून बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.ज्या महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होईल, त्या सर्व अटींनुसार पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे पुढील हप्तेही त्यांना नियमितपणे मिळण्याची शक्यता आहे.
थोडक्यात सांगायचं तर, सरकार आता योजनेत अधिक काटेकोरपणा आणत आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि गरजू महिलांपर्यंतच मदत पोहोचेल.आणि जे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळून त्यांच्या कडून वसुली सुध्दा केली जाऊ शकते. असे सांगितले जात आहे.