Ladki Bahin Yojana installment date: महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात महिलांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. जवळपास निम्म्या महिलांना पैसे मिळू शकले नाहीत.मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांचे थांबलेले हप्ते कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे.
सरकारने यासाठी जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे.राज्य सरकारने या योजनेसाठी तब्बल ७३०.५१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्र मिळणार आहेत
काही दिवसांपूर्वी १४ मेपासून अनेक महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे अनेक पात्र महिलांना अद्याप पैसे मिळाले नव्हते.
आता शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या महिलांचे हप्ते प्रलंबित आहेत त्यांना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये एकाच वेळी खात्यात जमा केले जाणार आहेत.आज सुद्धा काही महिलांना 1500 रूपये जमा झाले आहेत.या महिना अखेरीस सर्व पात्र महिलांना पैसे मिळू शकतील.
लाडकी बहीण योजनेची रचना
पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.घरगुती खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी या योजनेचा मोठा आधार मिळतो.महाराष्ट्र सरकारने ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती.
शासनाने जारी केला नवा GR
महिला व बाल विकास विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून नवीन शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्यासाठी प्रत्येकी ३६५.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण ७३०.५१ कोटी रुपयांचा हा निधी लवकरच थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
बजेटमध्ये कपात का ?
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने या योजनेसाठी २६,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी ही तरतूद ३६,००० कोटी रुपये होती. सरकारच्या माहितीनुसार, ई-केवायसी (e-KYC) आणि बँक खाते पडताळणी प्रक्रियेनंतर अनेक अपात्र आणि बोगस लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यामुळे खर्चात काही प्रमाणात कपात झाली असली तरी पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे.
शेतकऱ्यांना विहीरीत आडवा बोर घेण्यासाठी अनुदान मिळणार
महत्त्वाची सूचना
जर तुमचे हप्ते अद्याप खात्यात जमा झाले नसतील, तर ताबडतोब बँकेत जाऊन खालील गोष्टी तपासा:तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का?DBT (Direct Benefit Transfer) सेवा सुरू आहे का?बँक खात्याची KYC पूर्ण झाली आहे का?या गोष्टी योग्य असल्यास पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येणार नाही.
Ladki Bahin Yojana next installment date (FAQs)
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठीची कल्याणकारी योजना आहे. याद्वारे पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
२. महिलांना यावेळी ३,००० रुपये का मिळणार आहेत?मार्च आणि एप्रिल २०२६ चे हप्ते काही कारणांमुळे रखडले होते. आता हे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार असल्याने महिलांना ३,००० रुपये मिळतील.
३. सरकारने किती निधी मंजूर केला आहे?राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या प्रलंबित हप्त्यांसाठी एकूण ७३०.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
४. पैसे खात्यात येण्यासाठी काय आवश्यक आहे?लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT सेवा सक्रिय असणे आवश्यक आहे.