Crop insurance Update अखेर या जिल्ह्यात पिकविमा मंजूर

Crop insurance Update धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत सोयाबीन पिकाच्या crop insurance पीकविम्याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने collector office विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य पीक मानले जाते. यासाठी एकूण 504 पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यापैकी 368 प्रयोगांवर विमा कंपनीकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. या आक्षेपांमुळे हजारो शेतकऱ्यांचे पीकविमा दावे claim रखडले होते.

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल छाननी केली. त्यामध्ये 149 आक्षेप हे मुदतीनंतर दाखल झाल्यामुळे फेटाळण्यात आले. उर्वरित 217 प्रयोगांपैकी 17 प्रयोग रद्द करण्यात आले, तर 200 आक्षेप ग्राह्य धरून पुढील कार्यवाही करण्यात आली. जिल्हास्तरीय आढावा समितीने 22 डिसेंबर 2025 रोजी घेतलेला निर्णय कायम ठेवण्यात आला.

दरम्यान, विमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील दाखल केले होते. मात्र 14 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत समितीने कंपनीचे आक्षेप कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट करत ते नामंजूर केले. तसेच जिल्हास्तरीय समितीचा निर्णय योग्य असल्याचे मान्य करत त्याला मंजुरी देण्यात आली.

गाय गोठा अनुदान योजना सुरू झाली

एकाच फाॅर्म मध्ये 27 योजनांचा लाभ मिळणार

राज्यस्तरीय समितीने विमा कंपनीला कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्पादन आकडेवारीच्या आधारे तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पात्र शेतकऱ्यांचे पीकविमा दावे claim लवकरात लवकर निकाली काढून नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले आहे.

यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनीही विमा कंपनीला स्पष्ट इशारा दिला आहे. आदेशाच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब किंवा निष्काळजीपणा झाल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 4 लाख 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

प्राथमिक अंदाजानुसार पात्र शेतकऱ्यांना 350 ते 400 कोटी रुपयांपर्यंत पीकविमा मिळू शकतो.आता सर्वांचे लक्ष विमा कंपनीच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. कंपनीकडून पीकविमा गणनेची प्रक्रिया कधी सुरू होते आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने उचललेल्या या महत्त्वाच्या पावलामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविम्याचा मार्ग आता मोठ्या प्रमाणात मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment