Maharashtra Construction Worker Schemes 2026 एकाच योजनेत मिळणार 2500 ते 5 लाख रुपये अनुदान

Maharashtra Construction Worker Schemes 2026 – आता बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी.महाराष्ट्रात सध्या सगळ्यात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.आता ही योजना केवळ भांडी वाटप, पेट्या वाटप एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही.सरकारने या योजनेचा विस्तार केला आहे.या एका योजनेमुळे अनेक योजनांचा लाभ कामगारांना मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांसाठी सरकारने विविध कल्याणकारी योजनांची मोठी मालिका सुरू केली आहे.

तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी बांधकाम क्षेत्रात काम करत असेल, तर ही माहिती नक्कीच उपयोगी ठरणार आहे.या योजनांमधून शिक्षण, आरोग्य, घर, लग्न अशा अनेक गरजांसाठी थेट आर्थिक मदत दिली जाते.आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मदत पूर्णपणे अनुदान स्वरूपात असणार आहे.या योजनेमधून मिळणारा एक पैसा देखील माघारी देण्याची गरज नाही.त्यामुळे ही योजना खूप लोकप्रिय होत आहे.आज आपण या लेखात सोप्या भाषेत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

🏗️ योजनांचे प्रमुख प्रकार

या अंतर्गत सुमारे २७ योजना असून त्या प्रामुख्याने ४ गटांत विभागल्या आहेत:

🎓 १. शैक्षणिक सहाय्य (Education Benefits)कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती scholarship माध्यमातून च्या चांगली आर्थिक मदत दिली जाते.

इयत्ता १ली ते ७वी: दरवर्षी ₹२,५०० scholarship

इयत्ता ८वी ते १०वी: दरवर्षी ₹५,००० scholarship

१०वी/१२वी (५०% पेक्षा जास्त गुण): ₹१०,००० प्रोत्साहन

पदवी शिक्षण: दरवर्षी ₹२०,०००

MBBS: दरवर्षी ₹१ लाख

अभियांत्रिकी: दरवर्षी ₹६०,०००

MS-CIT कोर्स: पूर्ण फी परत

🏥 २. आरोग्य व विमा योजना (Health & Insurance)आरोग्याच्या बाबतीतही सरकारची साथ:प्रसूती सहाय्य: ₹१५,००० (सामान्य), ₹२०,००० (सिझरियन)गंभीर आजार उपचार: ₹१ लाखांपर्यंत मदतअपंगत्व: ७५% किंवा कायम अपंगत्व असल्यास ₹२ लाखविमा लाभ: जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजनांचा समावेश

💰 ३. आर्थिक व कौटुंबिक मदत (Financial Support)कुटुंबासाठी महत्त्वाच्या गरजांसाठी मदत:मुलीच्या लग्नासाठी: ₹५०,०००अवजारे खरेदी: दरवर्षी ₹५,०००पेन्शन: श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ

🏠 ४. घर बांधण्यासाठी व मृत्यू सहाय्य घर बांधण्यासाठी/खरेदीसाठी: ₹२ लाखांपर्यंत मदतअपघाती मृत्यू: वारसांना ₹५ लाखनैसर्गिक मृत्यू: ₹२ लाखअंत्यविधी खर्च: ₹१०,०००निवृत्तीनंतर: पती/पत्नीला ५ वर्षांपर्यंत मासिक मदत

📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार नोंदणी (Red Card) आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबीय)

रेशन कार्ड

बँक पासबुक

९० दिवस काम केल्याचा दाखला

वयाचा पुरावा (१८ ते ६० वर्षे)

हे देखील वाचा 👇

पासपोर्ट साईज फोटो

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट

बोअरवेल अनुदान योजना

📝 अर्ज कसा करावा?

नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आहे:अधिकृत वेबसाइट mahabocw.in वर जा‘New Worker Registration’ वर क्लिक करा.आधार आणि मोबाईल नंबरने लॉगिन करा.आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.अर्ज मंजूर झाल्यावर नोंदणी क्रमांक मिळेल

⚠️ महत्त्वाच्या अटी

रेशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यकशैक्षणिक लाभ फक्त दोन अपत्यांपर्यंत९० दिवस कामाचा पुरावा अनिवार्य

👉 शेवटचा सल्ला

बांधकाम कामगारांसाठी ही योजना खरंच मोठा आधार आहे. अजूनही नोंदणी केली नसेल, तर वेळ न दवडता आजच जवळच्या CSC सेंटरला भेट द्या किंवा मोबाईलवरून ऑनलाइन नोंदणी करा.सरकार देत असलेले हे हक्काचे लाभ नक्की मिळवा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार मजबूत करा.

Leave a Comment