Aai Karj Yojana: आई कर्ज योजना महिलांना 15 लाख रुपये कर्ज मिळणार !

Aai Karj Yojana 2025:आई कर्ज योजना 2025 – नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे “आई कर्ज योजना 2025”. राज्यातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, त्यांना उद्योग–व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्थिर मार्ग मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे.

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच महिलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आले आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे यासाठी शासन विविध योजना अमलात आणत असते. त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आई कर्ज योजना 2025.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेमुळे अनेक महिलांना आपली स्वप्ने साकार करण्याची आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगती मध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

व्याज सरकार भरणार

राज्यातील महिलांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी सरकारने ही योजना खास राबवली आहे. पर्यटनस्थळी उद्योग उभारण्यासाठी महिलांना आर्थिक पाठबळ देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त असेल. सरकारकडून तब्बल 4.50 लाख रुपयांपर्यंतची व्याजाची रक्कम भरली जाणार असल्यामुळे महिलांवर कोणताही आर्थिक ताण येणार नाही.

महिला होणार स्वावलंबी

या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावणे हा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच महिलांनी पर्यटन क्षेत्रात पुढे यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

व्यवसाय

“आई कर्ज योजना 2025” मुळे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या आसपास राहणाऱ्या महिलांसाठी नव्या संधींचे दार खुले होणार आहे. होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, गाईडिंग अशा विविध व्यवसायांमध्ये महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता येणार असून, त्यांच्या कष्टांना आणि कौशल्यांना योग्य दिशा मिळणार आहे.

आई कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

1. आई कर्ज योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कायमस्वरूपी महाराष्ट्राचे रहिवासी असावी.

2. संबंधित व्यवसाय हा महिलेच्या नावावर अधिकृत नोंदणी केलेला असावा.

3. तसेच या व्यवसायाची पर्यटन संचालनालयाकडे नोंद केलेली असावी.

4. या व्यवसायामध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असावेत.

5. व्यवसाय सुरू करण्यासाठी असणारे सर्व परवाने संबंधित महिलेकडे असावेत.

6. बँक खाते आधार सोबत संलग्नित केलेले असावे.

आई कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आई कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1.आधारकार्ड

2.पॅनकार्ड

3.व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र

4.प्रकल्प अहवाल

5. बँक तपशील

6.GST नंबर

7.FSSAI परवाना आवश्यक

8.प्रतिज्ञापत्र

Aai Karj Yojana आई कर्ज योजनेसाठी पुढील प्रमाणे अर्ज करावा

आई कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइट उघडल्यानंतर अर्जासाठी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करणे हे पहिले पाऊल आहे.
रजिस्ट्रेशन करताना तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अशी काही मूलभूत माहिती भरावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुमच्या खात्यासाठी एक पासवर्ड तयार करावा लागेल.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर ‘Login’ वर क्लिक करा. लॉगिनसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तयार केलेला पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकून “Validate OTP” वर क्लिक करा.
OTP पडताळणी झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर नवीन मेनू दिसेल. त्यामध्ये ‘Registration Form’ हा पर्याय निवडा. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक आणि नीट भरावी.
यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत आणि 50 रुपयांचे चालान भरावे लागेल.
संपूर्ण माहिती आणि कागदपत्रांची नोंदणी पूर्ण झाल्यावर ‘Submit’ वर क्लिक करा.
इतकी सोपी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही आई कर्ज योजनेखाली तुमचा अर्ज घरबसल्या सहज भरू शकता!

अर्ज लिंक – येथे क्लिक करा

Leave a Comment